व.पु.काळे म्हणजे आपल्या सर्वांचे आवडते लेखक. त्यांचे विचार आजही सर्वांच्या ह्रदयाचा ठाव घेतात. विशेषत: तरूण वर्गात त्यांचे विचार आजही लोकप्रिय आहेत. आजच्या पिढीला वाचनाची आवड निर्माण होण्यास त्यांचे विचार महत्त्वपूर्ण ठरतात. वपूर्झा, पार्टनर सारखी पुस्तके अनेकांच्या संग्रही सापडतात. कोणतही पान उघडून वाचलं तरी समजेल आणि वाचताना कधीही कंटाळा येणार नाही अशी वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैली. या कारणांमूळे व.पु. आजही वाचनप्रेमींच्या मनात घर करून आहेत. त्यांचे अनेक विचार,जीवनविषयक दृष्टिकोन, विविध मते आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. त्यातीलच काही निवडक विचारांचा संग्रह या लेखात केलेला आहे.
आयुष्यात शब्द कमी आणि भावना जास्त बोलतात. व.पु.काळे यांचे हे प्रेरणादायी शब्द त्याच भावनांचं प्रतिबिंब आहेत. योग्य वेळी वाचलेला एक विचारसुद्धा मनाचा भार हलका करू शकतो. तुम्हाला आवडलेले कोट्स नक्की जतन करा, शेअर करा आणि तुमच्या भावना शब्दांत मांडण्यासाठी त्यांचा उपयोग करा.


.png)
.png)






